पडघा प्राथमिक आरोग्य केंद्राला राज्यस्तरीय NQAS गुणवत्ता मानांकन

0
27
पडघा प्राथमिक आरोग्य केंद्राला राज्यस्तरीय NQAS गुणवत्ता मानांकन
पडघा प्राथमिक आरोग्य केंद्राला राज्यस्तरीय NQAS गुणवत्ता मानांकन

पडघा प्राथमिक आरोग्य केंद्राला राज्यस्तरीय NQAS गुणवत्ता मानांकन

९०.९७ टक्के गुणांसह उल्लेखनीय कामगिरी; रुग्ण समाधानाचा गुणांक ४.७/५

ठाणे :
ठाणे जिल्ह्याच्या आरोग्य विभागाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. भिवंडी तालुक्यातील पडघा प्राथमिक आरोग्य केंद्राने ९०.९७ टक्के एकूण गुणांसह राज्यस्तरीय NQAS (National Quality Assurance Standards) गुणवत्ता मानांकन प्राप्त केले आहे.

विशेष म्हणजे या प्राथमिक आरोग्य केंद्राला रुग्ण समाधानाचा ४.७/५ गुणांक मिळाला आहे. स्वच्छता, रुग्ण सुरक्षा, संसर्ग नियंत्रण, औषधे व आवश्यक साधनसामग्रीची उपलब्धता, गुणवत्ता व्यवस्थापन आणि रुग्णकेंद्री सेवा या विविध क्षेत्रांत सातत्यपूर्ण सुधारणा केल्यामुळे हे यश मिळाले.
पडघा प्राथमिक आरोग्य केंद्राने विविध निकषांमध्येही उल्लेखनीय गुण मिळविले आहेत. OPD – ९५.३३ टक्के, प्रयोगशाळा – ९४.३३ टक्के, NHP – ९२.३९ टक्के, Clinical Services – ९२.९१ टक्के, Infection Control – ९५.६६ टक्के, Quality Management – ९२.९२ टक्के आणि Outcomes – ९४.२८ टक्के अशी कामगिरी नोंदविण्यात आली.
या उल्लेखनीय कामगिरीसाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. निखिल जोगळेकर, डॉ. प्रज्ञेश पाटील, डॉ. साक्षी बुलबुले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ऋतुजा मुळे, जिल्हा गुणवत्ता नोडल अधिकारी डॉ. नलिणी ठोंबरे आणि जिल्हा गुणवत्ता आश्वासन समन्वयक डॉ. नेहा पेठकर यांनी विशेष परिश्रम घेतले.
पडघा प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका तसेच गुणवत्ता मानांकन प्रक्रियेत सहभागी सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांचे या कामगिरीबद्दल अभिनंदन करण्यात आले.
‘गुणवत्तापूर्ण आणि रुग्णकेंद्री आरोग्य सेवा — प्रत्येक नागरिकाचा हक्क’, असा संदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here