भरती परीक्षा सुधारणा टास्क फोर्सची कोकण विभागाला २९ सप्टेंबरला भेट
भरती परीक्षा सुधारणा टास्क फोर्सची कोकण विभागाला २९ सप्टेंबरला भेट
चेतना महाविद्यालयात विद्यार्थी व उमेदवारांशी साधणार थेट संवाद; १२ ते ३० सप्टेंबरदरम्यान राज्यातील सहा विभागांचा दौरा
मुंबई :
राज्यातील भरती परीक्षा प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या भरती परीक्षा सुधारणा उच्चस्तरीय टास्क फोर्सकडून १२ सप्टेंबरपासून विभागनिहाय राज्यव्यापी संवाद अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत टास्क फोर्स ३० सप्टेंबरपर्यंत राज्यातील सहा विभागांना भेटी देणार आहे.
या दौऱ्यात विद्यार्थी, विविध स्पर्धा परीक्षांचे उमेदवार तसेच भरती प्रक्रियेशी संबंधित विविध घटकांशी टास्क फोर्सचे सदस्य थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी, सूचना आणि अपेक्षा जाणून घेणार आहेत.
कोकण विभागाची भेट २९ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आली असून, चेतना महाविद्यालय तसेच मुंबई उपनगरीय जिल्हाधिकारी कार्यालयाशी संबंधित ठिकाणी संवादाचे आयोजन करण्यात येणार आहे.
भरती परीक्षा अधिक पारदर्शक, विश्वासार्ह आणि प्रभावी करण्याच्या दृष्टीने विद्यार्थी व उमेदवारांकडून मिळणाऱ्या सूचना आणि अभिप्राय महत्त्वाचे ठरणार आहेत. त्यामुळे संबंधितांनी या संवाद प्रक्रियेत सहभागी होऊन आपले मत मांडावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
आपल्या सूचना व अभिप्राय देण्यासाठी संबंधित QR Code स्कॅन करून आपली माहिती पाठविता येणार आहे.