सिडकोच्या ऑगस्ट २०२६ गृहनिर्माण योजनेची महासोडत ११ सप्टेंबरला
सिडकोच्या ऑगस्ट २०२६ गृहनिर्माण योजनेची महासोडत ११ सप्टेंबरला
‘माझा १st चॉईस – नवे घर, नवी ओळख’ योजनेतील ४,७७९ EWS घरांसाठी संगणकीय सोडत; शुक्रवारी दुपारी ३ वाजता आयोजन
नवी मुंबई :
सिडकोच्या ‘माझा १st चॉईस – नवे घर, नवी ओळख’ या ऑगस्ट २०२६ गृहनिर्माण योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (EWS) उपलब्ध करून देण्यात आलेल्या ४,७७९ घरांची संगणकीय महासोडत शुक्रवार, ११ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ३ वाजता आयोजित करण्यात आली आहे.
या सोडतीची प्रतीक्षा करणाऱ्या अर्जदारांची प्रतीक्षा आता संपली असून, संगणकीय महासोडतीचा कार्यक्रम सिडको भवन, सीबीडी बेलापूर येथील ७व्या मजल्यावर आयोजित करण्यात आला आहे.
सिडकोच्या या गृहनिर्माण योजनेतील घरांच्या संगणकीय महासोडतीचे साक्षीदार होण्यासाठी इच्छुकांना सहभागी होता येणार आहे. तसेच सोडतीचे थेट प्रक्षेपण युट्यूबवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
गृहनिर्माण योजनेसंदर्भातील अधिक माहिती, सोडतीची प्रक्रिया आणि इतर तपशीलांसाठी cidcohomes.com या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अर्जदारांना काही अडचणी किंवा शंका असल्यास ९९३०८७०००० / ८०६२३६८००० या हेल्पलाईन क्रमांकांवर संपर्क साधता येणार आहे.
ठिकाण : ७वा मजला, सिडको भवन, सीबीडी बेलापूर दिनांक : शुक्रवार, ११ सप्टेंबर २०२६ वेळ : दुपारी ३.०० वाजता घरांची संख्या : ४,७७९ EWS घरे