चिपळूणमध्ये गणपतीच्या फ्लेक्सवर आता QR कोड!

0
17
चिपळूणमध्ये गणपतीच्या फ्लेक्सवर आता QR कोड!
चिपळूणमध्ये गणपतीच्या फ्लेक्सवर आता QR कोड!

चिपळूणमध्ये गणपतीच्या फ्लेक्सवर आता QR कोड!

बॅनर कोणी लावला, कधी लावला आणि किती कालावधीसाठी परवानगी याची माहिती एका क्लिकवर

चिपळूण :
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात लावण्यात येणाऱ्या गणपतीचे फ्लेक्स आणि जाहिरात बॅनरच्या व्यवस्थापनासाठी QR कोडची अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्यामुळे एखाद्या फ्लेक्स अथवा बॅनरवर दिलेला QR कोड स्कॅन केल्यानंतर संबंधित बॅनरबाबतची महत्त्वाची माहिती नागरिकांना उपलब्ध होणार आहे.
QR कोडच्या माध्यमातून बॅनर अथवा फ्लेक्स कोणी लावला, तो कोणत्या तारखेला लावण्यात आला आणि कोणत्या तारखेपर्यंत लावण्यास परवानगी आहे, यासह संबंधित माहिती नागरिकांना पाहता येणार आहे.
गणेशोत्सव काळात शहरात मोठ्या प्रमाणात फ्लेक्स, बॅनर आणि जाहिरात फलक उभारले जातात. अशा फलकांबाबत पारदर्शकता राहावी तसेच अनधिकृत बॅनरवर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने QR कोडची ही व्यवस्था महत्त्वाची ठरणार आहे.
नागरिकांनी फ्लेक्सवरील QR कोड स्कॅन करून संबंधित बॅनरची माहिती तपासावी, तसेच अनधिकृत किंवा मुदत संपल्यानंतरही कायम असलेल्या फलकांबाबत प्रशासनाला माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
QR कोडमुळे ‘बॅनर कोणाचा?’पासून ‘परवानगी किती दिवसांची?’पर्यंतची माहिती नागरिकांच्या हातात उपलब्ध होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here