‘Say No To Drugs’ अंतर्गत ठाणे पोलिसांकडून विविध स्पर्धांचे आयोजन
‘Say No To Drugs’ अंतर्गत ठाणे पोलिसांकडून विविध स्पर्धांचे आयोजन
रॅप बॅटल, रील्स, पोस्टर व स्लोगन स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन
ठाणे :
अमली पदार्थांच्या सेवनाविरोधात जनजागृती करण्यासाठी ठाणे शहर पोलीस परिमंडळ-१ यांच्या वतीने ‘Say No To Drugs’ अभियानांतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
या उपक्रमात Rap Battle, Reels तसेच Poster & Slogan Competition अशा स्पर्धांचा समावेश आहे. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सहभागींसाठी २१ हजार रुपयांपर्यंतची रोख पारितोषिके ठेवण्यात आली आहेत.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी दिलेला QR Code स्कॅन करून ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे. नोंदणीची अंतिम तारीख ११ ऑक्टोबर २०२६ आहे.
तरुणांनी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होऊन अमली पदार्थांविरोधातील जनजागृतीला हातभार लावावा, असे आवाहन करण्यात आले आहे.