दापोलीत ५४ वी संयुक्त कृषी संशोधन व विकास समितीची बैठक

0
25
दापोलीत ५४ वी संयुक्त कृषी संशोधन व विकास समितीची बैठक
दापोलीत ५४ वी संयुक्त कृषी संशोधन व विकास समितीची बैठक

दापोलीत ५४ वी संयुक्त कृषी संशोधन व विकास समितीची बैठक

कृषी प्रदर्शनातून शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती

दापोली :
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथे ५४ वी संयुक्त कृषी संशोधन व विकास समितीची बैठक ९ ते ११ सप्टेंबरदरम्यान उत्साहात पार पडली.
या बैठकीच्या निमित्ताने कृषी प्रदर्शनाचेही आयोजन करण्यात आले होते. प्रदर्शनात नाविन्यपूर्ण शेतीसाठी उपयुक्त अवजारे, आधुनिक कृषी तंत्रज्ञान तसेच विविध प्रकारची बी-बियाणे प्रदर्शित करण्यात आली.
या प्रदर्शनामुळे स्थानिक शेतकऱ्यांना आधुनिक शेती पद्धती, नवीन तंत्रज्ञान, शेतीसाठी उपयुक्त साधने आणि विविध वाणांची माहिती मिळाली. बदलत्या काळानुसार शेतीमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी हे प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here