भूमिपुत्रांच्या विविध मागण्यांसाठी भिवंडीचे खासदार बाळ्या मामा म्हात्रे यांचे कोकण भवनात निवेदन

0
30

स्वतंत्र मंत्रालय, दिबा पाटील यांना भारतरत्न आणि कौशल्य विद्यापीठाच्या मागणीचा समावेश

नवी मुंबई :
आगरी, कोळी, कराडी, भंडारी आणि सागरी भूमिपुत्रांच्या विविध महत्त्वपूर्ण मागण्यांसाठी भिवंडीचे खासदार बाळ्या मामा म्हात्रे यांनी भूमिपुत्रांच्या शिष्टमंडळासह कोकण भवन, सीबीडी बेलापूर येथे भेट देऊन कोकण विभाग आयुक्तांना प्रत्यक्ष पत्र व निवेदन सादर केले.

भूमिपुत्रांच्या हक्कांशी संबंधित विविध मागण्या या निवेदनातून मांडण्यात आल्या. यामध्ये आगरी, कोळी, कराडी, भंडारी आणि सागरी भूमिपुत्रांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्याची प्रमुख मागणी करण्यात आली.
राष्ट्रीय लोकनेते दिबा पाटील यांनी शोषित, वंचित, महिला, शेतकरी आणि कष्टकरी वर्गासाठी दिलेल्या योगदानाची दखल घेत त्यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्कार प्रदान करावा, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली.
तसेच गावठाण, विस्तारित गावठाण आणि कोळीवाड्यांच्या पुनर्विकासासाठी स्वतंत्र व स्पष्ट धोरण आखावे, अशी मागणी करण्यात आली. प्रकल्पबाधित सागरी भूमिपुत्रांच्या रोजगाराच्या दृष्टीने स्वतंत्र कौशल्य विद्यापीठ (Skill University) स्थापन करण्याची मागणीही करण्यात आली.
भूमिपुत्रांच्या न्याय्य हक्कांसाठी आणि त्यांच्या विकासासाठी हा लढा पुढेही सुरू ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here