कणकवली रेल्वे स्थानकात चाकरमान्यांचे तुतारीच्या निनादात स्वागत

0
27
कणकवली रेल्वे स्थानकात चाकरमान्यांचे तुतारीच्या निनादात स्वागत
कणकवली रेल्वे स्थानकात चाकरमान्यांचे तुतारीच्या निनादात स्वागत

कणकवली रेल्वे स्थानकात चाकरमान्यांचे तुतारीच्या निनादात स्वागत

ड्रोनमधून पुष्पवृष्टी; पारंपरिक स्वागताने प्रवाशांचा आनंद द्विगुणित

कणकवली :
गणेशोत्सवासाठी मुंबईसह महाराष्ट्राच्या विविध भागांतून तसेच देश-विदेशातून कोकणवासीय मोठ्या संख्येने आपल्या गावी परतत आहेत. कोकण रेल्वेने कणकवलीत दाखल होणाऱ्या चाकरमान्यांचे कणकवली रेल्वे स्थानकावर तुतारीच्या निनादात उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले.
रेल्वे स्थानकावर दाखल झालेल्या प्रवाशांवर ड्रोनद्वारे फुलांची पुष्पवृष्टी करण्यात आली. त्याचबरोबर तुतारीच्या पारंपरिक सुरावटीने गणेशोत्सवाच्या उत्सवी वातावरणात आणखी रंग भरला.
दूरवरून आपल्या गावाकडे गणेशोत्सवासाठी परतलेल्या चाकरमान्यांना मिळालेल्या या आगळ्यावेगळ्या स्वागतामुळे प्रवासी भारावून गेले. तुतारीचा निनाद आणि पुष्पवृष्टीमुळे स्थानक परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
गावी परतताना मिळालेले हे पारंपरिक आणि मनापासून केलेले स्वागत पाहून प्रवाशांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. या स्वागतामुळे गणेशोत्सवाचा उत्साह अधिकच वाढला आणि चाकरमान्यांचा आनंद द्विगुणित झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here