माळेगाव साखर कारखान्याच्या कामकाजाचा आढावा; शेतकरी व कामगारांच्या प्रश्नांवर चर्चा

0
19

पुणे :
सहयोग निवासस्थानी माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळ आणि व्यवस्थापकीय संचालकांसोबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक पार पडली. या बैठकीत कारखान्याच्या एकूण कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
यावेळी शेतकरी, कामगार तसेच कारखान्याशी संबंधित विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. कारखान्याशी संबंधित प्रलंबित प्रश्न आणि आवश्यक बाबींची माहिती जाणून घेत संबंधित अधिकाऱ्यांना योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
कारखान्याचा कारभार अधिक सक्षम, पारदर्शक आणि प्रभावीपणे पुढे नेण्यासाठी आवश्यक त्या बाबींवर सातत्याने लक्ष देण्यात येईल, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here