सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; ४.४५ कोटींचा अन्नसाठा जप्त

0
25

मुंबई :
सणासुदीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सुरक्षित व दर्जेदार अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने राज्यभरात धडक कारवाई सुरू केली आहे. गेल्या दोन दिवसांत करण्यात आलेल्या कारवाईत तब्बल ४ कोटी ४५ लाख रुपये किमतीचा अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे.
अन्नपदार्थांमध्ये भेसळ, नियमांचे उल्लंघन तसेच नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण करणाऱ्या प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रशासनाकडून तपासणी व कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईची माहिती अन्न व औषध प्रशासनाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
सणासुदीच्या काळात अन्नपदार्थांची मागणी वाढत असल्याने नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने प्रशासनाने तपासणी मोहीम अधिक तीव्र केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here