शुभम गावडे कुटुंबीयांच्या घरी विराजमान झाले श्री गणराय
श्री. शुभम दीपक गावडे कुटुंबीयांच्या घरी विराजमान झाले श्री गणराय
भक्तिमय वातावरणात गणेशोत्सवाला प्रारंभ
दोडामार्ग :
गणेश चतुर्थीच्या मंगलमय दिवशी शुभम दीपक गावडे, दोडामार्ग (बँक ऑफ इंडिया, दोडामार्ग – कसाई) यांच्या निवासस्थानी श्री गणरायाची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली.
गणरायाच्या आगमनाने गावडे कुटुंबीयांच्या घरात भक्तिमय आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. पारंपरिक पद्धतीने पूजा-अर्चा करून श्री गणेशाची स्थापना करण्यात आली. यावेळी कुटुंबीयांनी मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहाने बाप्पाचे स्वागत केले.
“गणरायाच्या कृपेने सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, आरोग्य आणि आनंद नांदो,” अशी मनोभावे प्रार्थना गावडे कुटुंबीयांनी केली.