गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्ग प्रशासन सज्ज; नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जाहीर

0
17

सिंधुदुर्ग :
गणेशोत्सवाच्या काळात सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हा प्रशासनाने विविध हेल्पलाईन क्रमांक प्रसिद्ध केले आहेत. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना तातडीने मदत मिळावी, यासाठी हे संपर्क क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येने चाकरमानी आणि नागरिक सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल होत असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाने ही व्यवस्था केली आहे. नागरिकांनी हे हेल्पलाईन क्रमांक गावागावात पोहोचवावेत, आपल्या कुटुंबीयांना व परिचितांना शेअर करावेत आणि गरज पडल्यास त्यांचा उपयोग करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
आपत्कालीन परिस्थितीत संबंधित हेल्पलाईनशी संपर्क साधून तातडीने मदत घेता येणार आहे. “सतर्क राहूया, सुरक्षित गणेशोत्सव साजरा करूया,” असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here