‘वापस आलो नाही तर समाजाला दोष देऊ नको…’ — मनोज जरांगे पाटील
‘वापस आलो नाही तर समाजाला दोष देऊ नको…’ — मनोज जरांगे पाटील
जालना :
मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांच्या एका भावनिक संवादाची सध्या चर्चा होत आहे. पत्नीशी बोलताना त्यांनी आंदोलनाचा निर्धार व्यक्त करण्यासोबतच आपल्या कुटुंबीयांची काळजीही व्यक्त केल्याचे समोर आले आहे.
“लेकरांना कुणाच्या दारात जाऊ देऊ नको… गरज पडली तर रान विक, पण मुलीचं लग्न करून दे… मी परत आलो नाही, तरी माझ्या समाजासाठी घेतलेला निर्णय कधी चुकीचा समजू नकोस,” अशा आशयाचे शब्द जरांगे पाटील यांनी पत्नीशी बोलताना व्यक्त केल्याचे सांगितले जात आहे.
“वापस आलो नाही तर समाजाला दोष देऊ नको…” या त्यांच्या वक्तव्यामुळे आंदोलनामागील त्यांचा निर्धार आणि त्याचवेळी कुटुंबाबद्दलची चिंता अधोरेखित झाली आहे.
एकीकडे समाजाच्या हक्कांसाठी संघर्ष करणारा नेता, तर दुसरीकडे आपल्या लेकरांच्या भवितव्याची काळजी करणारा पिता, अशी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची भावनिक बाजू या संवादातून समोर येते. या संवादाची चर्चा सोशल मीडियावरही होत असून, अनेकांकडून प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.