दृष्टिहीन नागरिकांसाठी काम करणाऱ्या संस्थेला निधी द्या : जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

0
16
दृष्टिहीन नागरिकांसाठी काम करणाऱ्या संस्थेला निधी द्या : जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड
दृष्टिहीन नागरिकांसाठी काम करणाऱ्या संस्थेला निधी द्या : जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

दृष्टिहीन नागरिकांसाठी काम करणाऱ्या संस्थेला निधी द्या : जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

कोल्हापूर :
दृष्टिहीन नागरिकांच्या शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक आणि पुनर्वसनासाठी कार्यरत असलेल्या संस्थेला जिल्ह्यातील नागरिकांनी सामाजिक बांधिलकीतून स्वेच्छेने सढळ हाताने निधी द्यावा, असे आवाहन कोल्हापूरचे जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाईंड (नॅब), जिल्हा शाखा कोल्हापूर यांच्या वतीने आयोजित ध्वजनिधी २०२६ संकलन शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते.
डॉ. राठोड म्हणाले की, नॅब कोल्हापूर ही संस्था गेल्या ३६ वर्षांपासून जिल्ह्यातील दृष्टिहीन नागरिकांसाठी विविध उपक्रम राबवत आहे. दृष्टिहीन विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करण्याबरोबरच स्वयंरोजगारासाठी सहाय्य करून त्यांच्या पुनर्वसनासाठीही संस्था कार्यरत आहे. त्यामुळे नागरिकांनी सामाजिक बांधिलकीतून संस्थेला आवश्यक ती मदत करावी, असे त्यांनी आवाहन केले.
तसेच संस्थेमार्फत जिल्ह्यातील प्रत्येक शासकीय कार्यालयाला ध्वजनिधी संकलनाचे बॉक्स उपलब्ध करून देण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. यावेळी त्यांनी उपस्थित दृष्टिहीन विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी व गरजांची माहिती जाणून घेतली.
कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते ध्वजनिधी संकलनाचा शुभारंभ करण्यात आला. तसेच अंध पुनर्वसन उपक्रमांतर्गत अथर्व कोळेकर या विद्यार्थ्याला जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या हस्ते लॅपटॉप प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थाध्यक्ष सुनील नागराळे यांनी प्रास्ताविक केले. अंध दीपक कारंजकर यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली, तर शिवानंद पिसे यांनी आभार मानले. यावेळी विभाग नियंत्रक (एस.टी.) वृषाली भोसले, विजय रेळेकर, ॲड. धनंजय पठाडे, डॉ. नमिता खोत, जयश्री पिसे, केरबा हांडे यांच्यासह दृष्टिहीन विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here