रत्नागिरीत २१ सप्टेंबरला जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन
रत्नागिरीत २१ सप्टेंबरला जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन
वैयक्तिक तक्रारी व समस्यांवर थेट निवेदनाची संधी
रत्नागिरी :
महिलांच्या वैयक्तिक तक्रारी व समस्यांचे निवारण करण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील ‘जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन’ सोमवार, २१ सप्टेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे. हा लोकशाही दिन सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात होणार आहे.
दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हास्तरावर महिला लोकशाही दिन आयोजित केला जातो. यावेळी तक्रारदार महिलांना स्वतः उपस्थित राहून आपल्या वैयक्तिक प्रश्नांबाबत थेट निवेदन सादर करता येणार आहे. महिलांनी मांडलेल्या तक्रारी व प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करण्यासाठी संबंधित जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांना आवश्यक ते निर्देश दिले जाणार आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातील ज्या महिलांचे वैयक्तिक प्रश्न किंवा तक्रारी प्रलंबित आहेत, त्यांनी सोमवार, २१ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात स्वतः उपस्थित राहून आपले निवेदन सादर करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.