‘Bappa.org’ वरून गणेशोत्सव परंपरा जगासमोर आणा

0
14
‘Bappa.org’वरून गणेशोत्सव परंपरा जगासमोर आणा
‘Bappa.org’वरून गणेशोत्सव परंपरा जगासमोर आणा

‘Bappa.org’ वरून गणेशोत्सव परंपरा जगासमोर आणा

रत्नागिरी जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचे आवाहन; वैभवशाली गणेशोत्सवाचे डिजिटल दस्तऐवजीकरण करण्याची संधी

रत्नागिरी :
‘Bappa.org’
‘Bappa.org’
महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य भाग असलेल्या गणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सव’ म्हणून घोषित करण्यात आले असून, या उत्सवातील वैशिष्ट्यपूर्ण परंपरांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून देण्यासाठी ‘Bappa.org’ हा अधिकृत डिजिटल मंच सुरू करण्यात आला आहे. या माध्यमातून महाराष्ट्रातील गणेशोत्सव परंपरांचे डिजिटल स्वरूपात कायमस्वरूपी दस्तऐवजीकरण करण्यात येणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांना आपल्या घरातील तसेच सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणेशोत्सवाशी संबंधित आठवणी, अनुभव, परंपरा आणि सांस्कृतिक वैशिष्ट्ये या मंचावर नोंदविण्याची संधी उपलब्ध झाली आहे. घरची किंवा सार्वजनिक गणेश मंडळाची आरती रेकॉर्ड करून अपलोड करणे, बाप्पाचे छायाचित्र प्रसिद्ध करणे, गणेशोत्सवाशी संबंधित खास पाककृती तसेच स्थानिक प्रथा-परंपरांची माहिती देणे, अशा विविध माध्यमातून नागरिक सहभागी होऊ शकतात.
रत्नागिरी जिल्ह्यातील सार्वजनिक गणेश मंडळे, घरगुती गणेशोत्सव आणि पिढ्यानपिढ्या जपल्या जाणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण परंपरांची या उपक्रमांतर्गत नोंद केली जाणार आहे. यासोबतच स्थानिक श्रद्धा, प्रथा, सांस्कृतिक वैशिष्ट्ये आणि उत्सवाचे विविध पैलू यांचेही डिजिटल दस्तऐवजीकरण करण्यात येणार आहे.
गणेशोत्सवाच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्याचे सांस्कृतिक वैभव पुढील पिढ्यांसाठी जतन व्हावे आणि या परंपरांना राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळावी, यासाठी जिल्हावासीयांचा सहभाग महत्त्वाचा आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी होऊन आपल्या घरातील, गावातील आणि परिसरातील गणेशोत्सवाच्या वैशिष्ट्यपूर्ण परंपरा जगासमोर आणण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here