स्वच्छता व्यवस्थेत पायाभूत सुविधांपेक्षा प्रभावी अंमलबजावणी व शाश्वत देखभाल महत्त्वाची
सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचा इंडिया सॅनिटेशन कॉनक्लेव्हमध्ये सहभाग
नवी दिल्ली :
स्वच्छता व्यवस्थापनात केवळ पायाभूत सुविधा निर्माण करण्यापेक्षा त्यांची प्रभावी अंमलबजावणी, शाश्वत देखभाल आणि त्यातून साध्य होणाऱ्या परिणामांचे प्रभावी मूल्यांकन याला प्राधान्य दिले पाहिजे, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले.



