महाराष्ट्रासाठी ‘ग्लोबल सर्क्युलर वर्कफोर्स मोबिलिटी’ धोरणात्मक मसुद्याचे प्रकाशन
महाराष्ट्रासाठी ‘ग्लोबल सर्क्युलर वर्कफोर्स मोबिलिटी’ धोरणात्मक मसुद्याचे प्रकाशन
मुंबई :
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे ‘पॉलिसी पेपर ऑन ग्लोबल सर्क्युलर वर्कफोर्स मोबिलिटी फॉर महाराष्ट्र, 2026’ या धोरणात्मक मसुद्याचे प्रकाशन केले.
महाराष्ट्रातील मनुष्यबळाला जागतिक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, कौशल्याधारित मनुष्यबळाची आंतरराष्ट्रीय स्तरावर गतिशीलता वाढविणे आणि जागतिक रोजगार बाजारपेठेशी महाराष्ट्रातील कार्यबलाचा अधिक प्रभावी समन्वय साधणे, या दृष्टीने हा धोरणात्मक मसुदा महत्त्वाचा मानला जात आहे.
या वेळी मंत्री मंगलप्रभात लोढा, जयकुमार रावल, आमदार राजेश क्षीरसागर, तसेच ‘मित्र’ (महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन) चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
जागतिक पातळीवरील रोजगाराच्या बदलत्या स्वरूपाच्या पार्श्वभूमीवर कौशल्यविकास, रोजगारासाठी आंतरराष्ट्रीय संधी आणि महाराष्ट्रातील मनुष्यबळाला जागतिक बाजारपेठेशी जोडण्याच्या दृष्टीने या धोरणात्मक मसुद्याकडे पाहिले जात आहे.