लांब पल्ल्याच्या आरामदायी प्रवासासाठी एसटीच्या ताफ्यात २०० अत्याधुनिक व्होल्वो बसेस

0
14
लांब पल्ल्याच्या आरामदायी प्रवासासाठी एसटीच्या ताफ्यात २०० अत्याधुनिक व्होल्वो बसेस
लांब पल्ल्याच्या आरामदायी प्रवासासाठी एसटीच्या ताफ्यात २०० अत्याधुनिक व्होल्वो बसेस

लांब पल्ल्याच्या आरामदायी प्रवासासाठी एसटीच्या ताफ्यात २०० अत्याधुनिक व्होल्वो बसेस

मुंबई :
महाराष्ट्राच्या ग्रामीण भागापासून शहरांपर्यंत प्रवाशांची प्रमुख वाहिनी असलेल्या एसटी महामंडळाने लांब पल्ल्याच्या आरामदायी बससेवेत विस्तार करण्याची तयारी सुरू केली आहे. खासगी आराम बससेवांकडे जाणाऱ्या प्रवाशांना एसटीकडे आकर्षित करण्यासाठी महामंडळाच्या ताफ्यात लवकरच स्वमालकीच्या २०० अत्याधुनिक वातानुकूलित व्होल्वो बसेस दाखल करण्यात येणार आहेत.
या नव्या सेवेमध्ये सुरक्षितता, आरामदायी प्रवास, आधुनिक तंत्रज्ञान आणि दर्जेदार प्रवासी सेवेचा समावेश असेल, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. मोठ्या संख्येने व्होल्वो बसेस एसटी महामंडळाच्या ताफ्यात समाविष्ट होण्याची ही पहिलीच वेळ असल्याचेही त्यांनी सांगितले.

२५० किमीपेक्षा अधिक अंतरासाठी आरामदायी सेवा

२५० किलोमीटरपेक्षा अधिक अंतराच्या आणि साधारण पाच ते सहा तासांच्या प्रवासासाठी ४५ आसनी वातानुकूलित बसेस उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. तसेच रात्रीच्या लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी ३० किंवा ४५ शयनयान क्षमतेच्या बसेस उपलब्ध केल्या जाणार आहेत.

ऑनलाइन आरक्षणाची सुविधा

या बसेसचे तिकीट एसटीच्या अधिकृत ऑनलाइन आरक्षण व्यवस्थेबरोबरच खासगी डिजिटल ट्रॅव्हल प्लॅटफॉर्मवरूनही आरक्षित करता येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना तिकीट बुकिंगसाठी अधिक पर्याय उपलब्ध होतील.

हाय-एंड प्रवासी सेवेवर भर

प्रवाशांना केवळ आरामदायी बसप्रवासच नव्हे, तर आधुनिक आणि दर्जेदार प्रवासी सेवेचा अनुभव मिळावा यासाठी नव्या व्होल्वो बसेसमधील आतिथ्य व्यवस्थापनासाठी खासगी संस्थेची मदत घेण्याचे नियोजन आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातील तसेच आंतरराज्य मार्गांवर खासगी आराम बससेवेला मोठी मागणी असलेल्या मार्गांचा सर्वंकष अभ्यास करण्यात येत असून, त्यानुसार नव्या व्होल्वो बसेसचे मार्ग निश्चित केले जाणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here