रत्नागिरी शासकीय तंत्रनिकेतन कॅन्टीन निविदेला मुदतवाढ

0
18
रत्नागिरी शासकीय तंत्रनिकेतन कॅन्टीन निविदेला मुदतवाढ
रत्नागिरी शासकीय तंत्रनिकेतन कॅन्टीन निविदेला मुदतवाढ

रत्नागिरी शासकीय तंत्रनिकेतन कॅन्टीन निविदेला मुदतवाढ

३० सप्टेंबरपर्यंत निविदा खरेदीची संधी; ३ ऑक्टोबरपर्यंत करता येणार निविदा सादर

रत्नागिरी : शासकीय तंत्रनिकेतन, रत्नागिरी येथील विद्यार्थी ग्राहक भंडार संचालित उपहारगृह (कॅन्टीन) चालविण्यासाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या निविदेला मुदतवाढ देण्यात आली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर इच्छुक निविदाकारांना वेळेत अर्ज घेणे व निविदा सादर करणे शक्य व्हावे, यासाठी ही मुदतवाढ करण्यात आली आहे.
कॅन्टीन चालविण्याच्या निविदेची विक्री करण्याची मूळ अंतिम तारीख १९ सप्टेंबर २०२६ होती. मात्र, गणेशोत्सवामुळे अनेक इच्छुकांना निर्धारित कालावधीत निविदा प्रक्रिया पूर्ण करता आली नाही. त्यामुळे इच्छुकांना संधी मिळावी म्हणून निविदा विक्रीची मुदत ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे.
नवीन वेळापत्रकानुसार ३० सप्टेंबरपर्यंत निविदा खरेदी करता येणार असून, निविदा सादर करण्याची अंतिम तारीख ३ ऑक्टोबर २०२६ आहे. प्राप्त निविदा ६ ऑक्टोबर २०२६ रोजी उघडण्यात येणार आहेत.
विहित मुदतीत प्राप्त झालेल्या सर्व निविदा ६ ऑक्टोबर रोजी उपस्थित निविदाकार किंवा त्यांच्या अधिकृत प्रतिनिधींच्या उपस्थितीत उघडण्यात येतील, अशी माहिती शासकीय तंत्रनिकेतनच्या प्रभारी प्राचार्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
महत्त्वाच्या तारखा :
  • निविदा विक्रीची अंतिम तारीख : ३० सप्टेंबर २०२६
  • निविदा सादर करण्याची अंतिम तारीख : ३ ऑक्टोबर २०२६
  • निविदा उघडण्याची तारीख : ६ ऑक्टोबर २०२६

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here