हैदराबादमध्ये ११ ते १३ डिसेंबरदरम्यान भव्य आंतरराज्य मराठी एकांकिका स्पर्धा
हैदराबादमध्ये ११ ते १३ डिसेंबरदरम्यान भव्य आंतरराज्य मराठी एकांकिका स्पर्धा
हैदराबाद :
मराठी रंगभूमीच्या कलावंतांना आणि नवोदित नाट्यसंघांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी मराठी ग्रंथ संग्रहालय, हैदराबाद यांच्या वतीने भव्य आंतरराज्य मराठी एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही स्पर्धा ११, १२ आणि १३ डिसेंबर २०२६ या तीन दिवसांत हैदराबाद येथे होणार आहे. महाराष्ट्रासह विविध राज्यांतील मराठी नाट्यसंघ आणि कलाकारांना या स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.
मराठी रंगभूमीची परंपरा जपत नव्या पिढीतील कलाकारांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणे, तसेच राज्याबाहेरील मराठी रंगकर्मींना एकत्र आणणे, हा या उपक्रमामागील उद्देश आहे.
स्पर्धेतील सहभाग, नियम, प्रवेशिका आणि इतर माहितीसाठी आयोजकांकडून उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सूचनांकडे इच्छुक नाट्यसंघांनी लक्ष द्यावे.