परळचा राजा, नरे पार्क : ऐंशी वर्षांची भक्तीपरंपरा; परळमध्ये साकारले पंढरपूर

0
20

ऐंशी वर्षांची परंपरा अपार,
परळमध्ये झाले पंढरपूर साकार!
वारी आली राजाच्या दारी,
विठ्ठलरूपी माझा बाप्पा वारकरी!!
मुंबईतील परळचा राजा (नरे पार्क) गणेशोत्सवातील आकर्षणाचे केंद्र ठरला आहे. यंदा मंडळाने आपल्या ऐंशी वर्षांच्या परंपरेला भक्ती आणि वारकरी संस्कृतीची सुंदर जोड देत पंढरपूरच्या वारीचा देखावा साकारला आहे.
विठ्ठल-रखुमाईची भक्ती, वारकरी संप्रदायाची परंपरा आणि गणरायाच्या भक्तीचा सुंदर संगम या सजावटीतून अनुभवायला मिळत आहे. त्यामुळे “वारी आली राजाच्या दारी, विठ्ठलरूपी माझा बाप्पा वारकरी” ही संकल्पना भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या समृद्ध भक्तीपरंपरेचे दर्शन घडविणारा हा देखावा भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here