सुनेत्रा पवार यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या; निवेदने स्वीकारून अधिकाऱ्यांना कार्यवाहीच्या सूचना

0
12

मुंबई :
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यालयात पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या विविध भागांतून आलेले नागरिक, आजी-माजी आमदार, लोकप्रतिनिधी, पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या.

या भेटीदरम्यान सुनेत्रा पवार यांनी उपस्थितांशी संवाद साधत त्यांच्या भागातील विविध प्रश्न, अडचणी तसेच प्रलंबित आणि रखडलेल्या कामांबाबत माहिती जाणून घेतली. नागरिक व कार्यकर्त्यांकडून मांडण्यात आलेली गाऱ्हाणी आणि निवेदने त्यांनी स्वीकारली.
मांडण्यात आलेल्या विविध विषयांबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी आवश्यक तो पाठपुरावा करून कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले. स्थानिक पातळीवरील प्रश्न मार्गी लावण्यासाठी संबंधित यंत्रणांशी समन्वय साधण्यावर भर देण्यात आला.
नागरिकांचे प्रश्न समजून घेऊन त्यांची कामे मार्गी लावण्यासाठी पक्षाच्या माध्यमातून पाठपुरावा केला जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले. सुनेत्रा पवार यांनी नागरिक, लोकप्रतिनिधी आणि पक्ष कार्यकर्त्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला.
सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी २६ फेब्रुवारी २०२६ रोजी एकमताने निवड झाली होती. त्या सध्या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारीही सांभाळत आहेत.
दैनिक सिंधुदुर्ग समाचार | Dainik Sindhudurg Samachar

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here