रत्नागिरी विमानतळावरील ILS सिस्टीमसाठी बाधित परिसराची पाहणी

0
15
रत्नागिरी विमानतळावरील ILS सिस्टीमसाठी बाधित परिसराची पाहणी
रत्नागिरी विमानतळावरील ILS सिस्टीमसाठी बाधित परिसराची पाहणी

रत्नागिरी विमानतळावरील ILS सिस्टीमसाठी बाधित परिसराची पाहणी

घरे व मंदिर सुरक्षित ठेवण्याची उदय सामंतांची ग्वाही

रत्नागिरी :
रत्नागिरी विमानतळावर इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टीम (ILS) बसविण्यासाठी आवश्यक असलेल्या जागेच्या पाहणीदरम्यान स्थानिक नागरिकांच्या चिंता आणि संभाव्य अडचणी जाणून घेण्यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांनी बाधित होऊ शकणाऱ्या परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली. ILS सिस्टीमसाठी सुमारे सात एकर जागेची आवश्यकता असून प्रस्तावित जागेमुळे काही स्थानिकांची घरे आणि मंदिर बाधित होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सामंत यांची भेट घेऊन आपल्या समस्या मांडल्या.

नागरिकांशी सविस्तर चर्चा केल्यानंतर उदय सामंत यांनी अधिकाऱ्यांसमवेत थेट विमानतळ परिसरात जाऊन ILS सिस्टीमसाठी प्रस्तावित जागा तसेच आजूबाजूच्या परिसराची पाहणी केली. संभाव्य बाधित घरे आणि जागांची प्रत्यक्ष परिस्थिती जाणून घेत त्यांनी अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.
केवळ कागदावरील नकाशे आणि प्रस्तावांच्या आधारे निर्णय न घेता प्रत्यक्ष परिस्थिती समजून घेणे आवश्यक असल्याचे सामंत यांनी यावेळी सांगितले. विमानतळाचा विकास महत्त्वाचा असला तरी विकासाच्या प्रक्रियेत स्थानिकांचे राहते घर किंवा श्रद्धास्थान बाधित होणार नाही, याची काळजी घेण्यात येईल, अशी भूमिका त्यांनी मांडली.
ILS सिस्टीम उभारण्यासाठी पर्यायी पर्यायांचाही विचार करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. यासाठी दमण विमानतळावर वापरण्यात येणाऱ्या एअरपोर्ट सिस्टीमची माहिती घेऊन, त्याच धर्तीवरील पर्याय रत्नागिरी विमानतळासाठी वापरता येईल का, याची शक्यता तपासण्याच्या सूचना देण्यात आल्याचे सांगण्यात आले.
विमानतळाचा विकास आणि आधुनिक सुविधा आवश्यक असल्या तरी त्याचवेळी स्थानिक नागरिकांची घरे, श्रद्धास्थाने आणि हक्क सुरक्षित राहणेही महत्त्वाचे आहे. त्यामुळे दोन्ही बाबींमध्ये समतोल साधूनच पुढील निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन उदय सामंत यांनी स्थानिक नागरिकांना दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here