देवगडच्या कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ट्री ऑफ लाईफ’ हॉटेल; ताज समूहासोबत करार

0
12
देवगडच्या कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ट्री ऑफ लाईफ’ हॉटेल; ताज समूहासोबत करार
देवगडच्या कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ट्री ऑफ लाईफ’ हॉटेल; ताज समूहासोबत करार

देवगडच्या कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ट्री ऑफ लाईफ’ हॉटेल; ताज समूहासोबत करार

देवगड :
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला आणखी एक महत्त्वाची चालना मिळणार असून, देवगड तालुक्यातील प्रसिद्ध धार्मिक व पर्यटनस्थळ कुणकेश्वर येथे ताज हॉटेल्स समूहाच्या ‘ट्री ऑफ लाईफ’ (Tree of Life) ब्रँडचे आलिशान हॉटेल उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पासंदर्भातील करार २२ सप्टेंबर रोजी मंत्रालयात मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
कुणकेश्वर येथे उभारण्यात येणाऱ्या या हॉटेलमध्ये ५० खोल्या असणार असून, प्रकल्पाचे काम पुढील २४ महिन्यांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. सिंधुदुर्गमध्ये शिरोडा-वेळागरनंतर ताज समूहाचा आणखी एक प्रकल्प कुणकेश्वर येथे साकारत असल्याने जिल्ह्यातील पर्यटन सुविधांमध्ये भर पडणार आहे.
कुणकेश्वर हे धार्मिक पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण असून, येथे जागतिक दर्जाच्या हॉस्पिटॅलिटी सुविधांची भर पडल्यामुळे पर्यटकांसाठी निवास व पर्यटनाशी संबंधित सुविधा वाढण्याची अपेक्षा आहे. या प्रकल्पामुळे स्थानिक पातळीवर रोजगाराच्या तसेच विविध व्यवसायांच्या नव्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
या करारावेळी सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, ताज समूहाचे तन्वीर जाहीदी, दत्तात्रय हिरे आणि रोहन रानडे यांच्यासह संबंधित अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते. कोकणच्या निसर्गसौंदर्याला दर्जेदार पर्यटन सुविधांची जोड देण्याच्या दृष्टीने कुणकेश्वरमधील हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here