दादरमध्ये २८ ते ३० सप्टेंबरदरम्यान ‘गायन वादन महोत्सव’

0
9
दादरमध्ये २८ ते ३० सप्टेंबरदरम्यान ‘गायन वादन महोत्सव’
दादरमध्ये २८ ते ३० सप्टेंबरदरम्यान ‘गायन वादन महोत्सव’

दादरमध्ये २८ ते ३० सप्टेंबरदरम्यान ‘गायन वादन महोत्सव’

मुंबई :
रसिकांना विविध संगीत प्रकारांचा सुरेल अनुभव देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने ‘गायन वादन महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. हा महोत्सव २८ ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत दररोज सायंकाळी ६ वाजता श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिर, दादर, मुंबई येथे होणार आहे.
महोत्सवाच्या पहिल्या दिवशी, २८ सप्टेंबर रोजी कमलेश भडकमकर व सहकारी ‘लतानंद’ हा विशेष कार्यक्रम सादर करणार आहेत. या कार्यक्रमातून गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या अजरामर गीतांमधील वाद्यसुरांचा प्रवास उलगडला जाणार आहे.
२९ सप्टेंबर रोजी केदार देशमुख व संच ‘सप्तसूर’, तर ३० सप्टेंबर रोजी प्राची कोकीळ मराठे व सहकारी ‘भावबंध’ हा संगीत कार्यक्रम सादर करतील.
महाराष्ट्राच्या समृद्ध संगीतपरंपरेचे जतन, संवर्धन आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व कार्यक्रमांस प्रवेश विनामूल्य असून, संगीतप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सुरेल महोत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक प्रशांत खेडेकर यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here