सावंतवाडीत ‘लोकसंवाद-२०२६’ उपक्रम; गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून शासकीय योजनांची माहिती

0
8
सावंतवाडीत ‘लोकसंवाद-२०२६’ उपक्रम
सावंतवाडीत ‘लोकसंवाद-२०२६’ उपक्रम

सावंतवाडीत ‘लोकसंवाद-२०२६’ उपक्रम; गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून शासकीय योजनांची माहिती

सावंतवाडी :
सावंतवाडी येथील राष्ट्रीय एकात्मिक उत्सव मंडळ, नगरपालिका संकुल सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या आवारात २१ सप्टेंबर रोजी ‘लोकसंवाद-२०२६’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जिल्हा माहिती कार्यालय, सिंधुदुर्ग आणि जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम घेण्यात आला.
या उपक्रमात उपस्थित नागरिकांना शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना, शासकीय सेवा आणि नागरिकांसाठी उपलब्ध सुविधांची माहिती देण्यात आली. विशेषतः महिला व बालविकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले.
‘लोकसंवाद-२०२६’च्या माध्यमातून गणेशोत्सव मंडळे केवळ सांस्कृतिक उपक्रमांचे केंद्र न राहता शासकीय माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे प्रभावी माध्यम ठरत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने वर्षभर राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहितीही देण्यात आली.
गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या गणेशोत्सवाचे डिजिटल दस्तऐवजीकरण करण्यासाठी ‘Bappa.org’ पोर्टलची माहिती उपस्थितांना देण्यात आली.
यावेळी जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ, महिला व बालविकास अधिकारी बापू शिणगारे, अधीक्षक बी. जी. काटकर यांच्यासह विश्वास घाग, शैलेश मिस्त्री, गीतेश पोकळे, राजन शृंगारे, सुजित कोरगावकर, महेश केसरकर, अर्चित पोकळे, आनंद भोगण, संदीप कूपवडेकर आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here