चितारआळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात ‘लोकसंवाद-२०२६’; शासकीय योजनांची नागरिकांना माहिती

0
12
चितारआळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात ‘लोकसंवाद-२०२६’; शासकीय योजनांची नागरिकांना माहिती
चितारआळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात ‘लोकसंवाद-२०२६’; शासकीय योजनांची नागरिकांना माहिती

चितारआळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात ‘लोकसंवाद-२०२६’; शासकीय योजनांची नागरिकांना माहिती

सावंतवाडी :
सावंतवाडी येथील चितारआळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या आवारात ‘लोकसंवाद-२०२६’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जिल्हा माहिती कार्यालय, सिंधुदुर्ग आणि जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमात उपस्थित नागरिकांना शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना, शासकीय सेवा आणि उपलब्ध सुविधांबाबत माहिती देण्यात आली. विशेषतः महिला व बालविकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देत त्यांचा लाभ घेण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
‘लोकसंवाद-२०२६’च्या माध्यमातून गणेशोत्सव मंडळे ही केवळ सांस्कृतिक उपक्रमांची केंद्रे न राहता शासकीय माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे प्रभावी माध्यम ठरत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
चितारआळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने वर्षभर राबविलेल्या सामाजिक उपक्रमांची माहितीही यावेळी देण्यात आली. टाकाऊ कागदापासून गणेशमूर्ती तयार करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश मंडळाने दिला आहे. तसेच विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृतीचे कार्यक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली.
यावेळी मंडळाचे उपाध्यक्ष राघवेंद्र चितारी, उदय चितारी, गौरव दळवी, शुभम वरदम, कलपित नारुळकर, राकेश दळवी उपस्थित होते. तसेच जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ, महिला व बाल विकास अधिकारी बापू शिणगारे, अधीक्षक बी. जी. काटकर यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या उत्सवाचे डिजिटल दस्तऐवजीकरण करण्यासाठी ‘Bappa.org’ पोर्टलबाबतही यावेळी माहिती देण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here