वेंगुर्ल्यात २९ सप्टेंबरला रोजगार मेळावा; विविध कंपन्यांमध्ये रोजगाराच्या संधी
वेंगुर्ल्यात २९ सप्टेंबरला रोजगार मेळावा; विविध कंपन्यांमध्ये रोजगाराच्या संधी
वेंगुर्ला :
‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ २०२६ – महाराष्ट्र’ या राज्यव्यापी उपक्रमांतर्गत वेंगुर्ल्यात २९ सप्टेंबर २०२६ रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. कृषिभूषण आबासाहेब ऊर्फ रमाकांत मुकुंद कुबल शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वेंगुर्ला यांच्या वतीने हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
हा रोजगार मेळावा २९ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजल्यापासून डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला येथे होणार आहे. विविध क्षेत्रातील नामांकित कंपन्या या मेळाव्यात सहभागी होणार असून इच्छुक व पात्र उमेदवारांना मुलाखतीद्वारे रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
उमेदवारांनी मुलाखतीसाठी बायोडाटा तसेच शैक्षणिक अर्हतेची मूळ प्रमाणपत्रे सोबत आणावीत, असे आवाहन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वेंगुर्ला यांच्याकडून करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी या रोजगार मेळाव्याचा लाभ घेऊन उपलब्ध रोजगाराच्या संधींचा फायदा घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वेंगुर्ला कॅम्पस तसेच महिला काथ्या कारखाना, नजीक वेंगुर्ला येथे संपर्क साधावा, असे प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.