कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय दापोलीत राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवस उत्साहात
कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय दापोलीत राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवस उत्साहात
दापोली :
कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय, दापोली येथे २४ सप्टेंबर २०२६ रोजी राष्ट्रीय सेवा योजना (NSS) स्थापना दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. राष्ट्र उभारणीत राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्व अधोरेखित करत स्वयंसेवकांनी विविध उपक्रमांत सहभाग घेतला.
यावेळी NSS स्वयंसेवकांनी राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिनाचे राष्ट्र उभारणीतील महत्त्व तसेच समाजसेवा आणि सामाजिक बांधिलकीमध्ये NSS ची भूमिका याबाबत विचार व्यक्त केले. कार्यक्रमादरम्यान स्वयंसेवकांनी राष्ट्रीय सेवा योजनेची शपथ घेतली.
या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. संदीपकुमार जैन, विद्यार्थी परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. बी. एल. आयरे, विभाग प्रमुख डॉ. प्रवीण इंगळे, डॉ. अभिमान सावंत, NSS समन्वयक डॉ. हर्षल भांगे, सहसमन्वयक प्रा. एम. एच. थारकर, नशामुक्त भारत अभियानाचे समन्वयक डॉ. हेमंत श्रीरामे आणि सहाय्यक कुलसचिव श्री. जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता, अधिकारी, कर्मचारी आणि NSS स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतल्याने कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या पार पडला.