डोंबिवलीत २६ ते २८ सप्टेंबरला ‘कोकणी बाजारपेठ’; कोकणातील उद्योजकांची विविध उत्पादने एकाच छताखाली
डोंबिवलीत २६ ते २८ सप्टेंबरला ‘कोकणी बाजारपेठ’; कोकणातील उद्योजकांची विविध उत्पादने एकाच छताखाली
डोंबिवली :
कोकणातील उद्योजकांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ‘मिशन कोकण साम्राज्य’च्या वतीने ‘कोकणी बाजारपेठ’ या विशेष उपक्रमाचे आयोजन २६ ते २८ सप्टेंबर २०२६ रोजी डोंबिवली पूर्व येथे करण्यात आले आहे. डोंबिवली, दिवा, ठाकुर्ली आणि कल्याण परिसरातील नागरिकांसाठी ही बाजारपेठ खरेदीची खास पर्वणी ठरणार आहे.
या बाजारपेठेत कोकणातील उद्योजकांनी तयार केलेले विविध घरगुती पदार्थ, आकर्षक दागिने, सुंदर साड्या, कपडे, हस्तकला वस्तू, गिफ्टिंग साहित्य, नैसर्गिक उत्पादने तसेच विविध उपयुक्त वस्तू एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत. कोकणातील स्थानिक उत्पादनांना मोठ्या बाजारपेठेत ग्राहक मिळवून देण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
‘कोकणी बाजारपेठ’ हेरिटेज बँक्वेट हॉल, पेंढारकर कॉलेजजवळ, डोंबिवली पूर्व येथे भरविण्यात येणार आहे. २६, २७ आणि २८ सप्टेंबर रोजी सकाळी ११ ते रात्री ९ वाजेपर्यंत नागरिकांना या बाजारपेठेला भेट देता येणार आहे.
स्थानिक तसेच कोकणातील उद्योजकांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला नागरिकांनी कुटुंबीय आणि मित्रपरिवारासह भेट देऊन कोकणातील विविध उत्पादनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक अजय यादव यांनी केले आहे.