रेवस-रेड्डी सागरी महामार्गासाठी भूसंपादन मोबदला वाटपाला सुरुवात

0
10
रेवस-रेड्डी सागरी महामार्गासाठी भूसंपादन मोबदला वाटपाला सुरुवात
रेवस-रेड्डी सागरी महामार्गासाठी भूसंपादन मोबदला वाटपाला सुरुवात

रेवस-रेड्डी सागरी महामार्गासाठी भूसंपादन मोबदला वाटपाला सुरुवात

चौल, सावली व टोकेखार येथील खातेदारांना संमतीपत्र सादर करण्याचे आवाहन; १ ऑक्टोबरपर्यंत मुदत

अलिबाग :
रेवस-रेड्डी सागरी महामार्गासाठी भूसंपादन करण्यात येणाऱ्या क्षेत्राचा मोबदला वाटप करण्याची कार्यवाही अलिबाग येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात सुरू झाली आहे. संबंधित मिळकतीमध्ये ज्या व्यक्तींचा हितसंबंध आहे आणि त्यांना कोणत्याही प्रकारची हरकत असल्यास, आवश्यक कागदपत्रे व पुराव्यांसह उपविभागीय अधिकारी, अलिबाग यांच्या कार्यालयात हरकत दाखल करावी, असे आवाहन उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण यांनी केले आहे.
महाराष्ट्र महामार्ग अधिनियम, 1955 मधील कलम 19 (ब) नुसार भूसंपादनामुळे बाधित होणाऱ्या खातेदारांना भूसंपादन मोबदला स्वीकारण्याबाबतच्या नोटिसा २ सप्टेंबर २०२६ रोजी बजावण्यात आल्या आहेत. त्यानुसार अलिबाग तालुक्यातील मौजे चौल तसेच मुरुड तालुक्यातील मौजे सावली आणि टोकेखार येथील काही खातेदारांनी भूसंपादन मोबदला स्वीकारण्यासाठी संमतीपत्रे व करारपत्रे सादर केली आहेत.
उपविभागीय अधिकारी, अलिबाग यांच्या कार्यालयात प्राप्त झालेल्या संमतीपत्रांच्या आधारे संबंधित खातेदारांना भूसंपादन मोबदला वाटपाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. चौल, सावली आणि टोकेखार येथील खातेदारांनी नोटिसीत नमूद केलेल्या अटींनुसार जिल्हास्तरीय समितीने मंजूर केलेला मोबदल्याचा दर मान्य असल्यास आपले संमतीपत्र सादर करावे.
संबंधित खातेदारांनी १ ऑक्टोबर २०२६ पर्यंत, कार्यालयीन वेळेत आणि शासकीय सुट्ट्या वगळून, उपविभागीय अधिकारी, अलिबाग यांच्या कार्यालयात समक्ष उपस्थित राहून संमतीपत्र सादर करावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here