नवी मुंबई विमानतळ प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

0
14
नवी मुंबई विमानतळ प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबत महत्त्वपूर्ण चर्चा
नवी मुंबई विमानतळ प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

नवी मुंबई विमानतळ प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

दगडखाण व क्रशर प्लॉटधारकांसाठी पुढील १० वर्षांच्या नूतनीकरणाचा विचार

मुंबई :
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पामुळे प्रभावित झालेल्या दगडखाण व क्रशर प्लॉटधारकांच्या पुनर्वसनासंदर्भात तसेच प्रकल्पग्रस्तांच्या उदरनिर्वाहासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या दगडखाणींच्या जागांचे पुढील १० वर्षांसाठी नूतनीकरण आणि पर्यायी भूखंड उपलब्ध करून देण्याबाबत सह्याद्री अतिथीगृह येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पामुळे प्रभावित झालेल्या प्रकल्पग्रस्तांचे हक्क, त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन आणि भविष्यातील आर्थिक स्थैर्य लक्षात घेऊन संबंधित प्रश्नांवर योग्य तोडगा काढण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. उपलब्ध दगडखाणींच्या जागांचे पुढील १० वर्षांसाठी नूतनीकरण करण्यासोबतच आवश्यकतेनुसार पर्यायी भूखंड उपलब्ध करून देण्याच्या मुद्द्यावरही विचारविनिमय करण्यात आला.
प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांवर शासनस्तरावर आवश्यक कार्यवाही करून त्यांच्या पुनर्वसनासंदर्भातील अडचणी दूर करण्यावर भर देण्यात आला. त्यांच्या उपजीविकेचे साधन अबाधित राहावे आणि भविष्यातील आर्थिक स्थैर्यासाठी योग्य पर्याय उपलब्ध व्हावेत, यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने कार्यवाही करण्याबाबत चर्चा झाली.
या बैठकीस नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे, नगरसेवक विनोद म्हात्रे, अमित मेढकर तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here