क्रीडा ई-प्रमाण प्रणाली कार्यान्वित; खेळाडूंच्या ५ टक्के आरक्षणासाठी प्रक्रिया अधिक पारदर्शक

0
21
क्रीडा ई-प्रमाण प्रणाली कार्यान्वित; खेळाडूंच्या ५ टक्के आरक्षणासाठी प्रक्रिया अधिक पारदर्शक
क्रीडा ई-प्रमाण प्रणाली कार्यान्वित; खेळाडूंच्या ५ टक्के आरक्षणासाठी प्रक्रिया अधिक पारदर्शक

क्रीडा ई-प्रमाण प्रणाली कार्यान्वित; खेळाडूंच्या ५ टक्के आरक्षणासाठी प्रक्रिया अधिक पारदर्शक

मुंबई :
गुणवत्ताधारक खेळाडूंना शासकीय व निमशासकीय सेवेत ५ टक्के आरक्षणाचा लाभ पारदर्शक आणि त्रुटीमुक्त पद्धतीने मिळावा, यासाठी शासनाच्या नवीन क्रीडा धोरणांतर्गत ‘क्रीडा ई-प्रमाण’ (Krida e-Pramaan) ही ब्लॉकचेन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे.
या प्रणालीमुळे खेळाडूंच्या क्रीडा कामगिरीची पडताळणी आणि प्रमाणपत्र प्रक्रियेत सुलभता येणार असून बोगस प्रमाणपत्रांना आळा घालण्यास मदत होणार आहे. पडताळणी प्रक्रिया अधिक जलद आणि स्वयंचलित करण्याच्या उद्देशाने शासनाने ८ जानेवारी २०२६ रोजी शासन निर्णय जारी केला आहे.
क्रीडा संघटनांना सात दिवसांची मुदत
क्रीडा संघटनांनी स्पर्धा संपल्यानंतर ७ दिवसांच्या आत संबंधित खेळाडूंची यादी आणि स्पर्धेचे निकाल XLSX फाईलच्या स्वरूपात पोर्टलवर अपलोड करणे बंधनकारक करण्यात आले आहे. ही माहिती डिजिटल स्वाक्षरी (DSC) करून अपलोड करावी लागणार आहे. निर्धारित मुदतीत माहिती सादर न केल्यास त्यातून खेळाडूंचे नुकसान झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित क्रीडा संघटनेची राहणार आहे.
खेळाडूंना कार्यालयाच्या फेऱ्यांची गरज नाही
क्रीडा प्रमाणपत्रासाठी खेळाडूंना कागदपत्रे घेऊन विभागीय कार्यालयात वारंवार जाण्याची आवश्यकता राहणार नाही. खेळाडूंनी sports.maharashtra.gov.in किंवा kridaepramaan.org/register या पोर्टलवर आधार-संलग्न ओळख क्रमांकाच्या माध्यमातून नोंदणी करणे आवश्यक आहे.
ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या वापरामुळे प्रमाणपत्रांची विश्वासार्हता वाढण्यास मदत होणार असून पडताळणी प्रक्रियेत पारदर्शकता आणण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. अधिक माहितीसाठी संबंधित जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here