महाराष्ट्र चेंबरच्या जनसंपर्क समितीवर ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल देसाई…!

0
17
महाराष्ट्र चेंबरच्या जनसंपर्क समितीवर ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल देसाई...!
महाराष्ट्र चेंबरच्या जनसंपर्क समितीवर ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल देसाई...!

महाराष्ट्र चेंबरच्या जनसंपर्क समितीवर ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल देसाई…!

PR, मीडिया अँड कम्युनिकेशन कमिटीच्या सदस्यपदी नियुक्ती; विविध क्षेत्रांतून अभिनंदनाचा वर्षाव

आचरा – विवेक परब
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अँग्रीकल्चर (MACCIA) या राज्यातील उद्योग, व्यापार व कृषी क्षेत्रातील शिखर संस्थेच्या जनसंपर्क, माध्यम व संवाद समिती (PR, Media & Communication Committee) च्या सदस्यपदी मालवण येथील ज्येष्ठ पत्रकार व पर्यटन व्यावसायिक प्रफुल्ल वसंत देसाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष रवींद्र माणगावे यांच्या हस्ते देसाई यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अँग्रीकल्चर ही संस्था उद्योग, व्यापार आणि कृषी क्षेत्राच्या विकासासाठी कार्यरत असून, २०२७ मध्ये संस्थेला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. या ऐतिहासिक शताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर संस्थेच्या विविध तज्ज्ञ समित्यांमार्फत आगामी काळात विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. त्याच अनुषंगाने जनसंपर्क, माध्यम व संवाद समितीमध्ये प्रफुल्ल देसाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रफुल्ल देसाई यांच्या पत्रकारिता तसेच पर्यटन क्षेत्रातील अनुभवाचा समितीच्या कामकाजासाठी उपयोग होईल, असे अध्यक्ष रवींद्र माणगावे यांनी नियुक्तीपत्र देताना सांगितले. तसेच या नवीन जबाबदारीसाठी त्यांनी देसाई यांना शुभेच्छा दिल्या.
या नियुक्तीबद्दल मा. सि.वा. कोकण विभागाचे उपाध्यक्ष डॉ. संतोष राणे, कोकण विभागाचे माजी उपाध्यक्ष डॉ. दीपक परब, ट्रस्ट बोर्डचे चेअरमन आशिष पेंडणेकर, सिंधुदुर्गचे गव्हर्निंग कौन्सिल सदस्य ॲड. नकुल पार्सेकर, राजन नाईक, विजय केनवडेकर, मनोज वालावलकर, विशाल कामत, कुणाल वरस्कर आणि मिलिंद प्रभू यांनी प्रफुल्ल देसाई यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here