मंडणगड व खेडशी येथून दोन व्यक्ती बेपत्ता; माहिती देण्याचे पोलिसांचे आवाहन

0
14
मंडणगड व खेडशी येथून दोन व्यक्ती बेपत्ता
मंडणगड व खेडशी येथून दोन व्यक्ती बेपत्ता

मंडणगड व खेडशी येथून दोन व्यक्ती बेपत्ता; माहिती देण्याचे पोलिसांचे आवाहन

रत्नागिरी :
मंडणगड तालुक्यातील तिडे आदिवासीवाडी येथून एक महिला तर रत्नागिरी तालुक्यातील खेडशी येथून एक युवक बेपत्ता झाल्याच्या दोन स्वतंत्र घटना समोर आल्या आहेत. दोघांबाबत कोणालाही माहिती मिळाल्यास संबंधित पोलीस ठाण्याशी तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
मंडणगड तालुक्यातील तिडे आदिवासीवाडी येथील ताई शांताराम जाधव (वय ५६) या दि. २७ ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे ३ वाजता राहत्या घरातून अचानक बेपत्ता झाल्या. त्यांची उंची ४ फूट ३ इंच असून वर्ण निमगोरा, चेहरा गोल, नाक सरळ आणि डोळे काळे आहेत. बेपत्ता होताना त्यांनी लाल रंगाची साडी व त्यावर पिवळ्या रंगाच्या बारीक फुलांची नक्षी असलेला ब्लाऊज परिधान केला होता. त्यांच्या गळ्यात काळ्या मण्यांचे मंगळसूत्र आहे. त्यांच्याबाबत काही माहिती मिळाल्यास मंडणगड पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.
दरम्यान, खेडशी (मोरया एकतानगर, ता. जि. रत्नागिरी) येथील सुयोग उत्तम कोलगे (वय २६) हे दि. २० ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे ४ वाजता राहत्या घरातून निघून गेले असून अद्याप घरी परतलेले नाहीत. त्यांची उंची ५ फूट ३ इंच असून वर्ण गोरा, चेहरा उभा आणि बांधा बारीक आहे. त्यांना दाढी व मिशी आहे. ते निळ्या रंगाचा फुलांचा टी-शर्ट व निळ्या रंगाची फुल जीन्स परिधान करून घराबाहेर पडले होते.
सुयोग कोलगे यांच्याकडे मोटो कंपनीचा टॅब आणि आयफोन मोबाईल असून ते मरून रंगाच्या ॲक्टिव्हा दुचाकीवरून (क्रमांक MH 08 AH 4237) गेले आहेत. त्यांच्याबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास अथवा ते आढळून आल्यास रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याशी तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here