अलिबागमध्ये २ ते ४ ऑक्टोबरदरम्यान ‘अमृतपेठ थेट स्वदेशी बाजारपेठ’

0
21
अलिबागमध्ये २ ते ४ ऑक्टोबरदरम्यान ‘अमृतपेठ थेट स्वदेशी बाजारपेठ’
अलिबागमध्ये २ ते ४ ऑक्टोबरदरम्यान ‘अमृतपेठ थेट स्वदेशी बाजारपेठ’

अलिबागमध्ये २ ते ४ ऑक्टोबरदरम्यान ‘अमृतपेठ थेट स्वदेशी बाजारपेठ’

नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन

अलिबाग :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या वतीने ‘अमृतपेठ – थेट स्वदेशी बाजारपेठ’ उपक्रमाचे आयोजन अलिबाग येथील हॉटेल व्हेवज, टिळक रोड येथे करण्यात आले आहे. दि. २ ते ४ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत ही बाजारपेठ नागरिकांसाठी खुली राहणार आहे.
महिला सक्षमीकरण, लघुउद्योगांना चालना आणि स्वयंरोजगार निर्मिती या उद्देशाने ‘अमृत’ संस्थेमार्फत विविध उपक्रम राबविले जात आहेत. स्थानिक लघुउद्योजक तसेच लक्षित घटकातील विविध व्यवसायांचे प्रशिक्षण घेतलेल्या लाभार्थ्यांनी तयार केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे, त्यांच्या विक्री कौशल्याला चालना देणे आणि नवउद्योजकांना व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देणे, या उद्देशाने ‘अमृतपेठ थेट बाजारपेठ’ आयोजित करण्यात आली आहे.
रायगड जिल्ह्यातील लघुउद्योजक तसेच नागरिकांनी या बाजारपेठेला सहकुटुंब भेट देऊन स्थानिक नवउद्योजकांच्या उत्पादनांना प्रतिसाद द्यावा आणि त्यांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी स्वावलंबनाच्या दृष्टीने अशा उपक्रमांमधून विविध संधी उपलब्ध होत असल्याचे आयोजकांनी सांगितले.
शुक्रवार, दि. २ ऑक्टोबर ते रविवार, दि. ४ ऑक्टोबर २०२६ या तीन दिवसांच्या कालावधीत हॉटेल व्हेवज, टिळक रोड, अलिबाग येथे ‘अमृतपेठ’ बाजारपेठ भरविण्यात येणार आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट देऊन नवउद्योजकांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन रायगड जिल्हा व्यवस्थापक शैलेश मराठे यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी रायगड जिल्हा व्यवस्थापक 9112228759, शैलेश मराठे 9423892182 आणि मंगेश ढेबे 8149552143 यांच्याशी संपर्क साधता येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here