दुष्काळग्रस्त २६५ तालुक्यांतील शेतकऱ्यांना दिलासा; पीक कर्जाच्या पुनर्गठनासह कर्जवसुलीला स्थगिती

0
18
पीक कर्जाच्या पुनर्गठनासह कर्जवसुलीला स्थगिती
पीक कर्जाच्या पुनर्गठनासह कर्जवसुलीला स्थगिती

दुष्काळग्रस्त २६५ तालुक्यांतील शेतकऱ्यांना दिलासा; पीक कर्जाच्या पुनर्गठनासह कर्जवसुलीला स्थगिती

मुंबई :
सन २०२६ च्या खरीप हंगामात राज्यातील दुष्काळी परिस्थिती घोषित करण्यात आलेल्या २६५ तालुक्यांमधील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पीक कर्जाचे पुनर्गठन करण्याबाबत सहकार विभागाने परिपत्रक जारी केले आहे. तसेच शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती देण्याबाबतही या परिपत्रकात निर्देश देण्यात आले आहेत.
दुष्काळी परिस्थितीमुळे खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर पीक कर्जाच्या पुनर्गठनासह शेतीशी संबंधित कर्जाच्या वसुलीला स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या निर्णयामुळे दुष्काळ घोषित करण्यात आलेल्या २६५ तालुक्यांतील पात्र शेतकऱ्यांना कर्जाच्या परतफेडीसंदर्भात तात्पुरता दिलासा मिळण्याची शक्यता आहे. सहकार विभागाच्या परिपत्रकानुसार संबंधित यंत्रणांनी पुढील कार्यवाही करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here