विद्यार्थी एकजुटीचा विजय; MPSC सचिव महेंद्र हरपाळकरांची बदली, आता अध्यक्ष भिमनवारांच्या राजीनाम्याची मागणी – रोहित पवार
विद्यार्थी एकजुटीचा विजय; MPSC सचिव महेंद्र हरपाळकरांची बदली, आता अध्यक्ष भिमनवारांच्या राजीनाम्याची मागणी – रोहित पवार
पुणे :
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे (MPSC) सचिव महेंद्र हरपाळकर यांची अखेर बदली करण्यात आल्याने विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश मिळाल्याचे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे. २ ऑक्टोबर रोजी राज्य सरकारकडून हरपाळकर यांची सचिवपदावरील प्रतिनियुक्ती संपुष्टात आणण्याचा आदेश जारी करण्यात आला.
या निर्णयानंतर रोहित पवार यांनी “विद्यार्थी एकजुटीचा विजय” असे म्हणत सरकारचे आभार मानले. मात्र, विद्यार्थ्यांसमोर आता एक प्रमुख मुद्दा शिल्लक असल्याचे सांगत त्यांनी MPSC अध्यक्ष विवेक भिमनवार यांना पदावरून हटवण्याची मागणी केली.
“आता एकच प्रमुख मुद्दा शिल्लक असून तो म्हणजे भ्रष्ट अध्यक्षांना हटवणं. सरकारने अहंकार बाजूला ठेवून विद्यार्थ्यांची प्रामाणिक भावना समजून घ्यावी आणि अध्यक्ष भिमनवार यांना तातडीने पदावरून बाजूला सारावं,” अशी मागणी रोहित पवार यांनी केली.
MPSC परीक्षांमधील कथित गैरप्रकार, पेपरफुटी आणि परीक्षा प्रक्रियेतील त्रुटींवरून विद्यार्थ्यांकडून आंदोलन करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर सचिव महेंद्र हरपाळकर यांची बदली करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थी प्रतिनिधींना दिले होते. त्यानुसार सरकारने हरपाळकर यांची प्रतिनियुक्ती संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, MPSC अध्यक्ष विवेक भिमनवार यांच्याबाबतही चौकशीचा निर्णय सरकारने घेतल्याचे वृत्त आहे. त्यामुळे अध्यक्षांवरील पुढील कारवाईकडे विद्यार्थी आणि स्पर्धा