नवी मुंबईत आज ‘लोकशाही वाचवा’ महामोर्चा; राष्ट्रवादी काँग्रेस व इंडिया आघाडीचा सहभाग

0
12
लोकशाही वाचवा, महामोर्चा, नवी मुंबई, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार, इंडिया आघाडी, ईव्हीएम, बॅलेट पेपर, संविधान, sindhudurgsamachar

नवी मुंबई  
नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्र पवार गट व इंडिया आघाडीच्या संयुक्त वतीने आज, रविवार ४ ऑक्टोबर रोजी ‘लोकशाही वाचवा’ महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० वाजता मुंबईतील मेट्रो सिनेमा समोरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल (CSMT) येथे हा मोर्चा होणार आहे.
ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यात याव्यात, एसआयआर प्रक्रिया थांबवावी तसेच संविधानाचा सन्मान आणि लोकशाहीचे संरक्षण करण्यात यावे, अशा विविध मागण्या मोर्चाच्या माध्यमातून मांडण्यात येणार आहेत. नवी मुंबईतील पदाधिकारी, कार्यकर्ते, माजी नगरसेवक, तालुकाध्यक्ष, वॉर्ड अध्यक्ष व सेलचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.
वाशी स्टेशन येथून सकाळी ८ वाजता कार्यकर्ते मुंबईकडे रवाना होणार असून, मोर्चात केवळ राष्ट्रध्वज आणण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here