वायंगणी येथे १५ ऑक्टोबरला श्री स्वामी समर्थांचा दर्शन सोहळा

0
15
वायंगणी येथे १५ ऑक्टोबरला श्री स्वामी समर्थांचा दर्शन सोहळा
वायंगणी येथे १५ ऑक्टोबरला श्री स्वामी समर्थांचा दर्शन सोहळा

वायंगणी येथे १५ ऑक्टोबरला श्री स्वामी समर्थांचा दर्शन सोहळा

ललित पंचमी उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन; महिला भाविकांसाठी विशेष कुंकुम अभिषेक, महाआरती व महाप्रसादाचे आयोजन

आचरा-विवेक परब
वायंगणी येथील श्री स्वामी समर्थ मठात दरवर्षीप्रमाणे यंदाही ललित पंचमी उत्सवानिमित्त गुरुवार, १५ ऑक्टोबर २०२६ रोजी श्री स्वामी समर्थ यांच्या आदिशक्ती आदिमाया स्वरूपातील दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या धार्मिक सोहळ्याच्या निमित्ताने दिवसभर विविध धार्मिक व भक्तिमय कार्यक्रम होणार असून, भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शनाचा व सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ, वायंगणी यांच्या वतीने करण्यात आले आहे.
सोहळ्याची सुरुवात पहाटे ५ वाजता मंगल स्नानाने होणार आहे. सकाळी ६ वाजता नित्य आरती, तर ९ वाजता महिलांसाठी विशेष श्रीवर कुंकुम अभिषेक व तीर्थप्रसाद आयोजित करण्यात आला आहे. त्यानंतर दुपारी १२ वाजता महाआरती व १२.३० वाजता महाप्रसाद होणार आहे.
दुपारी ३ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत स्थानिकांची भजने आयोजित करण्यात आली असून, सायंकाळी ७ वाजता नित्य आरती होईल. त्यानंतर ७.३० वाजता श्री माऊली वारकरी दिंडी भजन मंडळ, मोरवे यांचे दिंडी भजन होणार आहे. या कार्यक्रमात बुवा विनोद कांदळगांवकर व पखवाज – गुरुनाथ कांदळगांवकर सहभागी होणार आहेत.
या सोहळ्यासाठी मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होणार असून, पंचमीच्या निमित्ताने श्री स्वामी समर्थांचे आदिशक्ती आदिमाया स्वरूपातील दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी उपस्थिती अपेक्षित आहे.
श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ, वायंगणी यांच्या वतीने भाविकांना आवाहन करण्यात आले आहे की, स्वामी भक्तांनी श्रद्धापूर्वक उपस्थित राहून या धार्मिक सोहळ्याचा लाभ घ्यावा. तसेच स्वामी समर्थांना श्रद्धावस्तू किंवा देणगीच्या स्वरूपात अर्पण करावयाची असल्यास मठाशी संपर्क साधावा, असेही कळविण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here