सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व आरोग्य सभापती एस. टी. सावंत यांचे निधन
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व आरोग्य सभापती एस. टी. सावंत यांचे निधन
नितेश राणेंकडून श्रद्धांजली
सिंधुदुर्ग :
मराठा समाजाचे ज्येष्ठ नेते तसेच सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व आरोग्य सभापती एस. टी. सावंत यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद असल्याची भावना मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केली.
एस. टी. सावंत यांनी सामाजिक, शैक्षणिक तसेच मराठा समाजाच्या विविध प्रश्नांसाठी केलेले कार्य सदैव स्मरणात राहील, असे नितेश राणे यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले. त्यांच्या निधनाने सामाजिक क्षेत्रात निर्माण झालेली पोकळी भरून काढणे कठीण असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या दुःखद प्रसंगी सावंत यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आपण मनापासून सहभागी असल्याचे सांगत, दिवंगत एस. टी. सावंत यांच्या आत्म्यास चिरशांती लाभावी आणि त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याचे बळ मिळावे, अशी ईश्वरचरणी प्रार्थना नितेश राणे यांनी केली.