आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णविजेत्या सूरज करकेराचा मुंबईत विशेष गौरव; ५० हजार रुपयांचे पारितोषिक

0
4

मुंबई :
आशियाई क्रीडा स्पर्धेत देदीप्यमान कामगिरी करत सुवर्णपदक पटकावणाऱ्या भारतीय हॉकी संघातील गोलरक्षक आणि मुंबईचा सुपुत्र सूरज करकेरा याचा मुंबईत विशेष गौरव करण्यात आला.
विधान परिषदेचे उपसभापती तथा ‘हॉकी मुंबई सिटी’चे अध्यक्ष सचिन अहिर यांनी विधान भवनातील आपल्या दालनात सूरज करकेरा याची सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांनी सूरजला ५० हजार रुपये रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देऊन त्याचा सत्कार केला. तसेच त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
सचिन अहिर यांनी सूरजच्या उत्कृष्ट गोलरक्षणाचे कौतुक करत भारतीय हॉकी संघाच्या ऐतिहासिक विजयाबद्दल आनंद व्यक्त केला. मुंबईच्या खेळाडूने आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची मान उंचावल्याबद्दल त्यांनी अभिमान व्यक्त केला.
यावेळी ‘हॉकी मुंबई सिटी’चे पदाधिकारी, अर्जुन पुरस्कार विजेत्या हेलन सोय (वेरी) तसेच आंतरराष्ट्रीय हॉकीपटू मनोरमा उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here