दिवाळीपूर्वी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत देणार – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
7
दिवाळीपूर्वी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत देणार - महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
दिवाळीपूर्वी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत देणार - महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

दिवाळीपूर्वी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत देणार – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई :
राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी जास्तीत जास्त मदत देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे दुष्काळासंदर्भातील मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. दुष्काळग्रस्त भागांमध्ये पंचनामे सुरू असून, त्यांचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर मदतीचे निकष, पीक विमा योजना आणि राज्य शासनाची मदत यांचा समन्वय साधून शेतकऱ्यांना मदत देण्यात येणार आहे.
राज्यात चाऱ्याची उपलब्धता वाढविण्यासाठी चारा बँका उभारण्यात येणार आहेत. तसेच वन विभागाच्या मोकळ्या जमिनी, तलाव परिसर आणि शासकीय जमिनींवर गवताळ क्षेत्र विकसित करण्यात येणार आहे. भाताची पेढी जाळण्याऐवजी तिचा चाऱ्यासाठी उपयोग करण्याचे आवाहनही मंत्री बावनकुळे यांनी केले.
ओलावा आणि मर्यादित पाणी उपलब्ध असलेल्या भागांमध्ये रब्बी हंगामात हरभरा आणि ज्वारीच्या पिकांना प्राधान्य देण्यात येणार आहे. दुष्काळ निवारणासाठी कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR)च्या माध्यमातून कंपन्यांची मदत घेण्यात येणार असून, अधिकाधिक कंपन्यांनी या उपाययोजनांसाठी सहकार्य करावे, असे आवाहन मंत्री बावनकुळे यांनी केले.
दरम्यान, आमदारांना त्यांच्या निधीतून २५ लाख रुपयांपर्यंतची कामे दुष्काळी उपाययोजनांसाठी घेण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवरील दुष्काळ निवारणाच्या कामांना गती मिळणार आहे.
दुष्काळी उपाययोजनांसाठी यापूर्वी घोषित करण्यात आलेल्या २६५ तालुक्यांव्यतिरिक्त वगळण्यात आलेल्या १९ तालुक्यांचाही समावेश करण्यात येणार असून, या तालुक्यांमध्ये २० टक्के पीक सर्वेक्षण करण्यात येणार आहे. आणखी काही तालुक्यांचा समावेश करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागविण्यात आला आहे. या अहवालाच्या आधारे मंत्रिमंडळ उपसमिती निर्णय घेणार असल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
या बैठकीला समिती सदस्य मंत्री पंकजा मुंडे, दत्तात्रय भरणे, मकरंद पाटील, नितेश राणे, गुलाबराव पाटील, संजय राठोड, जयकुमार गोरे, प्रताप सरनाईक, गिरीष महाजन, बाबासाहेब पाटील तसेच मुख्य सचिव राजेश अग्रवाल आणि संबंधित विभागांचे प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here