अगरतळ्यातील आसाम रायफल्स पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची राज्यपाल वर्मा यांच्याशी भेट

0
5

मुंबई :
महाराष्ट्राच्या शैक्षणिक भेटीवर आलेल्या अगरतळा, त्रिपुरा येथील आसाम रायफल्स पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी लोकभवन, मुंबई येथे महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची भेट घेतली.
यावेळी राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत महाराष्ट्राच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाची माहिती दिली. महाराष्ट्रातील विविध ऐतिहासिक स्थळे, सांस्कृतिक परंपरा आणि राज्याच्या समृद्ध वारशाविषयी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांच्या या शैक्षणिक भेटीचे आयोजन केल्याबद्दल राज्यपाल वर्मा यांनी आसाम रायफल्सचे अभिनंदन केले. अशा प्रकारच्या शैक्षणिक भेटींमुळे विद्यार्थ्यांना विविध राज्यांच्या इतिहास, संस्कृती आणि परंपरांचा प्रत्यक्ष परिचय होतो, असे त्यांनी सांगितले.
देशातील विविध भागांतील विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक व सांस्कृतिक देवाणघेवाण वाढल्यास परस्परांतील समज, बंधुभाव आणि राष्ट्रीय एकात्मता अधिक दृढ होण्यास मदत होईल, असा विश्वासही राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here