सूक्ष्म व लघु उद्योगांना कारखाना भाड्यावर ३० हजारांपर्यंत अनुदान

0
5
सूक्ष्म व लघु उद्योगांना कारखाना भाड्यावर ३० हजारांपर्यंत अनुदान
सूक्ष्म व लघु उद्योगांना कारखाना भाड्यावर ३० हजारांपर्यंत अनुदान

सूक्ष्म व लघु उद्योगांना कारखाना भाड्यावर ३० हजारांपर्यंत अनुदान

महाराष्ट्रात ‘फ्लॅटेड फॅक्टरी रेंट सबसिडी’ योजना

मुंबई :
राज्यातील पात्र सूक्ष्म व लघु विनिर्माण उद्योगांना प्रत्यक्ष मासिक कारखाना भाड्याच्या ३० टक्के किंवा कमाल ३० हजार रुपये प्रतिमहिना, यापैकी जी रक्कम कमी असेल ती भाडे अनुदान म्हणून देण्यात येणार आहे. भाड्याच्या खर्चाचा भार कमी करून सूक्ष्म व लघु उद्योगांसाठी अधिक सहाय्यक आणि अनुकूल व्यावसायिक वातावरण निर्माण करण्याच्या दिशेने ही योजना महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळाच्या आयुक्त व व्यवस्थापकीय संचालक प्रेरणा देशभ्रतार यांनी सांगितले.
भाडे अनुदान योजनेचा QR कोड
भाडे अनुदान योजनेचा QR कोड
भारत सरकार आणि जागतिक बँकेच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या Raising and Accelerating MSME Performance (RAMP) कार्यक्रमासाठी महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळ हे नोडल एजन्सी म्हणून कार्यरत आहे. या कार्यक्रमांतर्गत सूक्ष्म व लघु उद्योगांवरील स्थापना आणि परिचालन खर्चाचा भार कमी करण्यासाठी फ्लॅटेड फॅक्टरी भाडे अनुदान योजना सुरू करण्यात आली आहे.
या योजनेमुळे पात्र सूक्ष्म व लघु विनिर्माण उद्योगांना कारखाना जागेच्या भाड्याचा खर्च कमी करण्यासाठी आर्थिक मदत मिळणार आहे. उद्योगांच्या स्थापना आणि दैनंदिन परिचालन खर्चावरील ताण कमी करून त्यांना व्यवसायवाढीसाठी अधिक अनुकूल वातावरण उपलब्ध करून देणे हा या योजनेचा उद्देश आहे.
महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाने योजनेसाठी RAMP पोर्टलद्वारे अर्ज मागविले आहेत. इच्छुक उद्योगांनी योजनेची सविस्तर मार्गदर्शक तत्त्वे, पात्रता निकष आणि अर्ज प्रक्रियेची माहिती पोर्टलवर पाहून अर्ज करावा. यासाठी महामंडळाच्या अधिकृत पोर्टलवर उपलब्ध असलेली माहिती तसेच भाडे अनुदान योजनेचा QR कोड वापरता येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here