मच्छिमार सहकारी संघावरील अंतरिम अवसायनास स्थगिती देण्याचे निर्देश

0
4
मच्छिमार सहकारी संघावरील अंतरिम अवसायनास स्थगिती देण्याचे निर्देश
मच्छिमार सहकारी संघावरील अंतरिम अवसायनास स्थगिती देण्याचे निर्देश

मच्छिमार सहकारी संघावरील अंतरिम अवसायनास स्थगिती देण्याचे निर्देश

नाशिकमधील २ हजार मच्छिमार कुटुंबांना दिलासा

नाशिक :
नाशिक जिल्हा मच्छिमार व कृषी सहकारी संघाच्या कामकाजाचा, विविध तलावांच्या वाटपाचा तसेच मच्छिमार संस्थांना भेडसावणाऱ्या विविध अडचणींचा मंत्रालयात आढावा घेण्यात आला. मत्स्य व्यवसाय व बंधारे मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली आणि अन्न व औषध प्रशासन सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली.
नाशिक जिल्हा मच्छिमार व कृषी सहकारी संघ लि., नाशिक यांच्यावरील अंतरिम अवसायनास स्थगिती देऊन जिल्ह्यातील सुमारे २ हजार मच्छिमार कुटुंबांना न्याय मिळवून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश मंत्री नितेश राणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
मच्छिमार संस्थांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ थेट मिळावा आणि त्यामध्ये मध्यस्थांचा हस्तक्षेप होऊ नये, यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचनाही बैठकीत देण्यात आल्या. संस्थांच्या दैनंदिन कामकाजासह उत्पादन, साठा, आर्थिक व्यवहार आणि इतर आवश्यक नोंदी अद्ययावत ठेवण्याचे निर्देश देण्यात आले.
संबंधित कागदपत्रे शासनाकडे वेळेत सादर करावीत तसेच संस्थांचे प्रशासकीय कामकाज आणि आर्थिक व्यवहार पारदर्शक ठेवावेत, असेही स्पष्ट करण्यात आले. मच्छिमार संस्थांचे उत्पन्न वाढविण्यासाठी शासनाच्या विविध योजना, निधी आणि आवश्यक सहकार्य उपलब्ध करून देण्यात येईल, असे यावेळी सांगण्यात आले.
बैठकीस मत्स्य आयुक्त भानुदास पालवे, मत्स्योद्योग महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश खपले तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here