विरार येथे ८ ते ११ ऑक्टोबरदरम्यान ५३ वी कुमार-कुमारी गट राज्य अजिंक्यपद कबड्डी निवड चाचणी
विरार येथे ८ ते ११ ऑक्टोबरदरम्यान ५३ वी कुमार-कुमारी गट राज्य अजिंक्यपद कबड्डी निवड चाचणी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातून कुमार व कुमारी गटातील प्रत्येकी १५ खेळाडूंची निवड
विरार :
वसई-विरार शहर महानगरपालिका व नगर जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या वतीने ५३ वी कुमार व कुमारी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा ८ ते ११ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत म्हाडा मैदान, विरार पश्चिम, तालुका वसई, जिल्हा पालघर येथे होत आहे.
विरार येथे ८ ते ११ ऑक्टोबरदरम्यान ५३ वी कुमार-कुमारी गट राज्य अजिंक्यपद कबड्डी निवड चाचणी
या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीने कुमार व कुमारी गटातील प्रत्येकी १५ स्पर्धकांची निवड करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवा कबड्डीपटूंना राज्यस्तरावर आपले कौशल्य दाखविण्याची संधी या स्पर्धेच्या माध्यमातून मिळणार आहे.
स्पर्धेत सहभागी होणारे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खेळाडू उत्कृष्ट कामगिरी करून जिल्ह्याचे नाव राज्यस्तरावर उज्ज्वल करण्यासाठी सज्ज झाले आहेत.