सोमेश्वर साखर कारखाना निवडणूक २०२६ - सुनेत्रा पवार यांनी बजावला मतदानाचा हक्क
सोमेश्वर सहकारी साखर कारखाना निवडणूक २०२६ – उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बजावला मतदानाचा हक्क
वाघळवाडी येथील मतदान केंद्रावर ‘ब’ वर्गातून मतदान; सभासदांना मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन
वाघळवाडी :
राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या अंतर्गत होत असलेल्या श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूक २०२६ मध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मतदानाचा हक्क बजावला. शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, वाघळवाडी येथे त्यांनी ‘ब’ वर्गांतर्गत मतदान केले.
सहकारी साखर कारखाने हे ऊस उत्पादक शेतकरी, सभासद आणि त्यांच्या कुटुंबांच्या आर्थिक जीवनाशी जोडलेले महत्त्वाचे घटक आहेत. त्यामुळे कारखान्याच्या भविष्यातील वाटचालीसाठी प्रत्येक सभासदाचे मत महत्त्वाचे मानले जाते.
श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या सर्व सभासद मतदारांनी मोठ्या संख्येने मतदानासाठी पुढे येऊन आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन करण्यात आले. सभासदांचा सक्रिय सहभाग सहकार क्षेत्रातील लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी महत्त्वाचा असल्याचेही नमूद करण्यात आले.