मंत्री नितेश राणे यांनी कफ परेड येथे घेतले आंबे मातेचे दर्शन
सुपर बॉय सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाच्या उत्सवाला उपस्थिती; कोळी समाजाच्या संस्कृती आणि परंपरेचा गौरव
मुंबई :
मंत्री नितेश राणे यांनी कुलाबा येथील कफ परेड, मच्छीमार नगर क्रमांक २ मधील सुपर बॉय सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाच्या वतीने आयोजित नवरात्रोत्सवाला उपस्थित राहून आंबे मातेचे मनोभावे दर्शन घेतले.

कोळी समाजाचे संस्कृती, श्रद्धा आणि परंपरेशी असलेले नाते अतूट आहे. आंबे मातेचा आशीर्वाद कोळी बांधवांच्या पाठीशी सदैव राहो, अशी प्रार्थना यावेळी नितेश राणे यांनी केली.



